संकष्ट चतुर्थी
- Onkar Date
- Apr 26, 2024
- 1 min read
चैत्र कृष्ण चतुर्थी, शक १९४६, दिनांक 27 एप्रिल 2024, शनिवार
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
लंबोदर - ज्याच्या उदरातून अनंतकोटी ब्रह्मांड जन्माला येतात. ज्याच्या उदरातच ती खेळतात आणि अंती ज्या उदरातच ती लुप्त होतात. त्या अनंत कोटी ब्रह्मांडरूपी उदरधारीला शास्त्रकार लंबोदर रूपात आळवतात.
धूम्रवर्ण - धूम्र म्हणजे धूर, धूर समोर असला की पैलतीराचे काही दिसत नाही. यथार्थ स्वरूप कळत नाही आणि वर्ण म्हणजे त्वचेचा रंग, अर्थात सर्वात बाह्य बाब. प्रथमदर्शन बाह्यतमरूप आणि ज्या गणराजांचे बाह्यरूपही, अगदी ईश्वर महेश्वरांनाही नेमके दिसत नाही. ज्यांचे यथार्थ रूप त्यांनाही सहज कळत नाही. त्यापरमगूढतत्वास म्हणतात धूम्रवर्ण.
विकट - शास्त्रकार 'कट' शब्द वेडेवाकडे या अर्थी योजतात. आणि वेडीवाकडी असते माया. ही माया ज्यांच्यापासून वि-गत अर्थात दूर झाली असते त्या परब्रह्मास विकट म्हणतात.
विघ्ननायक - संकलविघ्नांचा अधिपती. खरे विघ्न आहे हा भवबंध. हा संसार. हा भवसागर, त्याच्यावर ज्याची सत्ता चालते तो विघ्ननायक.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
27 एप्रिल 2024, शनिवार - संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २२:१२
अकोला २१:५९ | जबलपूर २१:५३ | पुणे २२:०६ | रांजणगांव २२:०५ |
अमरावती २१:५६ | जळगांव २२:०५ | पुळे २२:०५ | लातूर २१:५५ |
अलिबाग २२:११ | जालना २२:०१ | बीड २१:५९ | वडोदरा २२:१९ |
अहमदनगर २२:०४ | ठाणे २२:१२ | बीदर २१:५० | वर्धा २१:५२ |
अहमदाबाद २२:२३ | धारवाड २१:५४ | बुलढाणा २२:०२ | विजयपूर २१:५४ |
इंदूर २२:०८ | धाराशिव २१:५६ | बेंगळूरु २१:३७ | वेंगुर्ले २२:०१ |
ओझर २२:१२ | धुळे २२:०९ | बेळगांवी २१:५७ | छ.संभाजीनगर २२:०४ |
कलबुर्गि २१:५१ | नांदेड २१:५३ | भंडारा २१:४९ | सांगली २१:५९ |
कल्याण २२:११ | नागपूर २१:५१ | भुसावळ २२:०५ | सातारा २२:०४ |
कारवार २१:५६ | नाशिक २२:१० | भोपाळ २२:०४ | सावंतवाडी २२:०० |
कोल्हापूर २२:०० | पंढरपूर २१:५८ | महड २२:०९ | सिद्धटेक २२:०३ |
गदग २१:५१ | पणजी २१:५९ | मोरगाव २२:०३ | सोलापूर २१:५६ |
गोकर्ण २१:५५ | परभणी २१:५६ | यवतमाळ २१:५३ | हुब्बळ्ळी २१:५३ |
ग्वाल्हेर २२:०९ | पाली २२:०९ | रत्नागिरी २२:०५ | हैदराबाद २१:४४ |
Comments