संकष्ट चतुर्थी, 16 एप्रिल 2025
- Onkar Date
- Apr 15
- 2 min read
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.

संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
ज्येष्ठराजो निधिपतिर्निधीप्रियपतिप्रियः । हिरण्मयपुरान्तस्थः सूर्यमण्डलमध्यगः ॥
ज्येष्ठराज - ज्येष्ठ शब्दांचा अर्थ आहे महान, श्रेष्ठ, सामान्य जीवांपेक्षा ईश्वर ज्येष्ठ आहेत. इंद्रचंद्रादिक ईश्वरांपेक्षा ब्रह्माविष्णु महेश्वरादि परमेश्वर ज्येष्ठ आहेत. अशा सगळ्या ज्येष्ठांपेक्षाही ज्येष्ठ ते ज्येष्ठराज.
निधिपती - नवविध निधींचे पालक-मालक.
निधिप्रियपतिप्रिय - वैभवाचे संरक्षक रूपात कुबेर नामक देवतेचे वर्णन येते. ते सगळ्या निधींचे पालक असतात अतः ते निधिप्रियपती आणि त्या सर्व कुबेरादिक देवतांनाही जे प्रिय आहेत ते गणनाथ निधिप्रियपति-प्रिय.
हिरण्मयपुरान्तस्थ - १) साधकांच्या हृदयास हिरण्मयपुर म्हणतात. २) स्थूल, सूक्ष्म तथा कारण नामक तीन देहास शास्त्रात लोह, रजत तथा सुवर्ण रूपात वर्णिले आहे. या कारण देहाच्या आत वा हृदयाकाशात श्रीगणेश विराजित असतात अतः ते हिरण्मयपुरान्तस्थ होत.
सूर्यमण्डलमध्यग - सूर्य अर्थात तेज, ज्ञान, समस्त तेजांच्या तथा ज्ञानाच्या अधिष्ठानरूपात प्रकाशित अतः सूर्यमण्डलमध्यग.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
16 एप्रिल 2025, बुधवार - मुंबई चंद्रोदय २१:५१
अकोला - २१:३८ | जबलपूर - २१:३२ | पुणे - २१:४६ | रांजणगांव - २१:४५ |
अमरावती - २१:३५ | जळगांव - २१:४५ | पुळे - २१:४५ | लातूर - २१:३४ |
अलिबाग - २१:५० | जालना - २१:४० | बीड - २१:३९ | वडोदरा - २१:५७ |
अहमदनगर - २१:४३ | ठाणे - २१:५१ | बीदर - २१:२९ | वर्धा - २१:३१ |
अहमदाबाद - २२:०२ | धारवाड - २१:३४ | बुलढाणा - २१:४१ | विजयपूर - २१:३४ |
इंदूर - २१:४७ | धाराशिव - २१:३६ | बेंगळूरु - २१:१८ | वेंगुर्ले - २१:४१ |
ओझर - २१:५१ | धुळे - २१:४८ | बेळगांवी - २१:३७ | छ.संभाजीनगर - २१:४३ |
कलबुर्गि - २१:३१ | नांदेड - २१:३२ | भंडारा - २१:२८ | सांगली - २१:३९ |
कल्याण - २१:५१ | नागपूर - २१:३० | भुसावळ - २१:४४ | सातारा - २१:४३ |
कारवार - २१:३६ | नाशिक - २१:४९ | भोपाळ - २१:४२ | सावंतवाडी - २१:४० |
कोल्हापूर - २१:४० | पंढरपूर - २१:३८ | महड - २१:४९ | सिद्धटेक - २१:४२ |
गदग - २१:३२ | पणजी - २१:३९ | मोरगाव - २१:४३ | सोलापूर - २१:३५ |
गोकर्ण - २१:३५ | परभणी - २१:३५ | यवतमाळ - २१:३२ | हुब्बळ्ळी - २१:३४ |
ग्वाल्हेर - २१:४७ | पाली - २१:४९ | रत्नागिरी - २१:४५ | हैदराबाद - २१:२४ |
Comments