संकष्ट चतुर्थी, 16 फेब्रुवारी 2025
- Onkar Date
- Feb 15
- 2 min read
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

कूष्मांडसामसम्भूतिर्दुर्जयो धूर्जयो जयः। भूपतिर्भुवनपतिर्भूतानां पतिरव्ययः ॥
कूष्मांडसामसंभूती - कूष्मांड हा एक विशिष्ट यज्ञ आहे. त्या यज्ञात जी सामवाणी उच्चारली जाते ती श्रीगणेशांची स्तुती असल्याने 'त्याद्वारे प्रगट होणारे' हा भाव.
दुर्जय - ज्यांना कोणी जिंकूच शकत नाही असे. जिंकणे हे बलवानाद्वारे घडत असते आणि श्रीगणराज सर्वोच्च सत्ता असल्याने दुर्जय ठरतात.
धूर्जय - 'धुरी' हा शब्द बैलगाडी इ. वाहनांशी संबंधित आहे. बैलांच्या खांद्यावर असणाऱ्या आडव्या खांबास गाडीस जोडणाऱ्या भागाला धुरी म्हणतात. तिथे बसून गाडी हाकालतो तो धुरकरी. तसे या जगाचा गाडा जे चालवितात ते सकललोक संचालक भगवान धूर्जय ठरतात.
जय - सकल विजय हे ज्यांचे स्वरूप आहेत असे.
भूपती - भू शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. या पृथ्वीचे पती अर्थात पालक ते भूपती.
भुवनपती - भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम् असे सात स्वर्ग असतात तथा अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे सात पाताल असतात. या चौदा लोकांना भुवने असे म्हणतात. या चतुर्दश भुवनात्मक सृष्टीचे पालक म्हणून भुवनपती.
भूतानांपती - १) भूत शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे 'जे निर्माण झाले आहे ते' त्या समस्त यञ्च्चयावत् सृष्टीचे पालक. २) पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांना पंचमहाभूते म्हणतात, त्यांचे पालक.
अव्यय - व्यय अर्थात खर्च होणे, कमी होणे, क्षय होणे, घटत जाणे. मात्र परब्रह्म तत्व हे परिपूर्ण असल्याने त्यात हे विकार येतच नाहीत. अतः ते अव्यय रूपात ओळखले जाते.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
16 फेब्रुवारी 2025, रविवार - मुंबई चंद्रोदय २१:४८
अकोला - २१:३२ | जबलपूर - २१:२१ | पुणे - २१:४४ | रांजणगांव - २१:४२ |
अमरावती - २१:२९ | जळगांव - २१:३८ | पुळे - २१:४६ | लातूर - २१:३३ |
अलिबाग - २१:४८ | जालना - २१:३६ | बीड - २१:३६ | वडोदरा - २१:४९ |
अहमदनगर - २१:४१ | ठाणे - २१:४८ | बीदर - २१:२८ | वर्धा - २१:२६ |
अहमदाबाद - २१:५२ | धारवाड - २१:३८ | बुलढाणा - २१:३६ | विजयपूर - २१:३५ |
इंदूर - २१:३८ | धाराशिव - २१:३५ | बेंगळूरु - २१:२५ | वेंगुर्ले - २१:४३ |
ओझर - २१:४५ | धुळे - २१:४१ | बेळगांवी - २१:४० | छ.संभाजीनगर - २१:३९ |
कलबुर्गि - २१:३१ | नांदेड - २१:२९ | भंडारा - २१:२२ | सांगली - २१:४० |
कल्याण - २१:४७ | नागपूर - २१:२४ | भुसावळ - २१:३७ | सातारा - २१:४३ |
कारवार - २१:४१ | नाशिक - २१:४५ | भोपाळ - २१:३२ | सावंतवाडी - २१:४३ |
कोल्हापूर - २१:४२ | पंढरपूर - २१:३७ | महड - २१:४७ | सिद्धटेक - २१:४० |
गदग - २१:३५ | पणजी - २१:४२ | मोरगाव - २१:४२ | सोलापूर - २१:३५ |
गोकर्ण - २१:४० | परभणी - २१:३२ | यवतमाळ - २१:२७ | हुब्बळ्ळी - २१:३७ |
ग्वाल्हेर - २१:३१ | पाली - २१:४७ | रत्नागिरी - २१:४५ | हैदराबाद - २१:२४ |
Comments